धामणे : धामणे येथील बसवाण्णा देवाच्या यात्रेची हर हर महादेवच्या गजरात दि. 6 रोजी सायंकाळी 7 वाजता सांगता झाली.
सोमवार दि. 5 रोजी इंगळ्याचा कार्यक्रम झाला. दुपारी आंबिल गाडे आणि गाडे पळवणे कार्यक्रम पार पडला. मंगळवार दि. 6 रोजी सकाळी सजवलेल्या बैलजोडींची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 2 वाजता बसवाण्णा मंदिरसमोर येथील देवस्की पंचांच्यावतीने विधीवत पूजन करून इंगळय़ा पेटविण्यात आल्यानंतर गाऱहाणे घालण्यात आले. या कार्यक्रमानंतर भक्तीमय वातावरणात यात्रेची सांगता झाली.