वार्ताहर /धामणे
धामणे येथे आयोजित रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. येथील शिवशक्ती युवक मंडळाच्यावतीने दीपावलीनिमित्त आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन व बसवाण्णा देवीचे पूजन ग्रा. पं. सदस्य एम. के. पाटील, ग्रा. पं. सदस्य कोनेरी बाळेकुंद्री आणि हभप युवराज मादाकाचे यांच्याकडून पूजनाने झाले. पाडव्यानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत एकूण 27 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या रांगोळी स्पर्धेचे निरीक्षक म्हणून पिंटू मुचंडी, वडगाव, मनोज यळ्ळूरकर यांनी काम पाहिले. या रांगोळी स्पर्धेत संजना चौगुले प्रथम, गंगा बाळेकुंद्री द्वितीय, मीलन बेड्रे तृतीय, साक्षी रेमाणाचे चौथा, साक्षी बाळेकुंद्री हिने पाचवा क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना ग्रा. पं. सदस्य एम. के. पाटील, हभप लक्ष्मण यळ्ळूरकर, बाळू रेमाणाचे, मनोज हुलजी, शुभम लोकळूचे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष बाळू केरवाडकर यांनी आभार मानले.