चौथ्या दिवशीच्या दौडमध्ये सहभागी शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या नियमावलीमुळे यावषी मोजक्मयाच धारकऱयांना दौडमध्ये सहभागी होता आले. प्रतीवषी 20 ते 25 हजार धारकरी सहभागी होत असत. मात्र सध्या 15 धारकऱयांना सहभागी होता येत आहे. संख्या जरी कमी असली तरी शिवभक्तांमध्ये उत्साह मात्र तोच आहे. हाच उत्साह चौथ्या दिवशीच्या दौडमध्ये पाहण्यास मिळाला.
चौथ्या दिवशीच्या दौडला नाथ पै चौक शहापूर येथे अंबाबाई मंदिरापासून सुरूवात झाली. माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. नगरसेवक रवी साळुंके यांच्या हस्ते आरती करण्यात आली. शिवशंभूच्या नावाचा गजर करत फटाक्मयांच्या आतषबाजीत नाथ पै चौक मार्गे दौड पुढे निघाली. गोवावेस येथील संत बसवेश्वर चौक येथे दौडची सांगता झाली. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमणी यांच्या हस्ते आरती करून ध्वज उतरविण्यात आला. यावेळी शिवप्रति ष्ठानचे निवडक धारकरी उपस्थित होते.
दौडमध्ये सुवर्ण सिंहासनाविषयी जनजागृती
रायगडावर 32 मणाचे सुवर्ण सिंहासन भिडे गुरूजींच्या प्रेरणेतून उभारले जाणार आहे. यासाठी देशभरातून निधी संकलन केले जात आहे. बेळगावमधून अधिकाधिक कर्तव्य निधीचे संकलन व्हावे या उद्देशाने दौडमध्ये सुवर्ण सिंहासनाविषयी जनजागृती केली जात आहे.
मंगळवार दि. 12 रोजीचा दौडचा मार्ग…
सहाव्या दिवशीची दौड मंगळवार दि. 12 रोजी होणार आहे. दुर्गामाता मंदिर खासबाग येथून दौडला प्रारंभ होईल. बाजारगल्ली वडगाव, हरिमंदीर क्रॉस, विष्णुगल्ली येथून मंगाई मंदिर येथे सांगता होणार आहे.