दूध पावडर प्रकरणातही धरपकड : किंगपीन किरण विरनगौडरची कसून चौकशी
प्रतिनिधी / बेळगाव
यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात कार अडवून कारमधील 4 किलो 900 ग्रॅम सोन्याची परस्पर विक्री केल्या प्रकरणाची धारवाड-बेळगाव, संकेश्वर परिसरात चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील किंगपीन किरण विरनगौडर याला 14 दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
मंगळवारी सीआयडीचे पथक हुबळी-धारवाडमध्ये होते. सध्या संकेश्वर पोलीस स्थानकात दाखल झालेल्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यमकनमर्डी पोलिसांनी पकडलेली कार सोडविण्यासाठी किरणने सराफी व्यवसायाकडे 70 लाखांची मागणी केली होती. 30 लाखांना व्यवहार ठरविण्यात आला होता व 25 लाख रुपये घेण्यात आले होते.
संकेश्वर येथील एका लॉजमध्ये 15 लाख व धारवाड येथील कॅफे कॉफीडेसमोर 10 लाख रुपये घेण्यात आले होते. सीआयडीच्या अधिकाऱयांनी या दोन्ही ठिकाणांना भेटी देऊन पंचनामा केल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकरणांची मांडवली करण्यासाठी बेळगावला येताना किरण टोलनाक्मयावर पोलीस अधिकारी असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवायाचा.
पोलीस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून सरकारला फसविल्या प्रकरणीही हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला असून सीआयडीने बनावट ओळखपत्र ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल 14 दिवस किरणची चौकशी होणार आहे. त्याच्या चौकशीत आणखी कोणती माहिती बाहेर पडणार आहे? याकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, दूध पावडर प्रकरण दडपण्यासाठी बागलकोट जिल्हय़ातही याच टोळीने लाखोंचे व्यवहार केले होते. ते प्रकरणही सीआयडीकडे सोपविले आहे. मंगळवारी सीआयडीने महालिंगपूरच्या नगराध्यक्षांचे पती शिवानंद अंगडी याला अटक केली आहे. शिवानंद हा खासगी वाहतूकदार असून जमखंडी येथे सरकारी योजनेतील दूध पावडर जप्त केली होती. हे प्रकरण दडपण्यासाठीही मोठय़ा प्रमाणात व्यवहार करण्यात आला होता.