रामनगर/ वार्ताहर
धारवाड मार्गावर दुचाकीला कंटेनर धडकल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. खानापूर तालुक्मयातील बामणकोप येथील लिंगपा पेडणेकर (वय 45) व त्याचा मुलगा पांडुरंग पेडणेकर (वय 15) हे रामनगर येथून कपडे खरेदी करून आपल्या दुचाकीवरून जात असताना राजस्थानहून गोव्याकडे येणाऱया कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने लिंगापा जागीच ठार झाला. सदर अपघात चिंचेवडीनजीक झाला आहे. जखमी मुलाला 108 रुग्णवाहिकेतून रामनगर दवाखान्यात नेण्यात आले असून उपचार सुरू आहेत.