क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केएससीए 16 वर्षाखालील आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी धारवाड विभागीय संघात बेळगाव जिल्हय़ाच्या खेळाडूंची निवड झाली आहे. हुबळी येथे झालेल्या आंतरजिल्हा स्पर्धेतील प्रदर्शनाच्या आधारे ही निवड केली गेली. बेंगळूर येथे होणाऱया आंतरविभागीय स्पर्धेत हा संघ रवाना झाला.
धारवाड विभागीय संघात विराज हावेरी – कर्णधार (हुबळी), सिद्देश असलकर (बेळगाव), एस. अखिल (धारवाड), मनिकांत बुकीटगार (हुबळी), पियुष गोहेलोत (बेळगाव), सर्फराज जमखंडी धारवाड, तनुष धुमाले (बेळगाव), अथर्व नुली (बेळगाव), रमेश बागेवाडी (हुबळी), साईराज देसाई (बेळगाव), महंमद शाहीद खतीब (हुबळी), राहुल सातण्णावर (गदग), हर्ष पटेल (बेळगाव), प्रितम लढद व सोहन कल्लूर (दोघेही हुबळी) तर राखीव खेळाडु गौरव कांटे (बेळगाव), कावेश मुक्कण्णावर (बेळगाव), यशयश कुरबूर (कारवार), हर्ष व्ही. पटेल (बेळगाव), अब्दुल समिर देवनाळी (हुबळी) यांची निवड झाली असून, संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून प्रमोद कामत तर संघ व्यवस्थापक म्हणून आनंद करडी बेळगाव यांची निवड करण्यात आली आहे.
जयराज नुली, मंजुनाथ मुगबस्ती, मनोजकुमार मल्होत्रा, संगम पाटील यांनी काम पाहिले. सी. बी. कार्तिक बेंगळूर व अविनाश पोतदार समन्वयक यावेळी उपस्थित होते.