धारवाड/प्रतिनिधी
कर्नाटकातील धारवाडच्या हद्दीत बुधवारी झालेल्या अपघातात चार जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी तिघेजण एकाच कुटुंबातील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसर्या दिशेने जाणाऱ्या एका कारला समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की या चौघांचा जागीच मृत्यू झाला. रायचूर जिल्ह्यातील मानवी तालुक्यातील रहिवासी एक कुटुंब कारद्वारे कारवार जिल्ह्यात जात होते. पण नियतीने त्यांच्यावर घाला घातला. दरम्यान अपघातात जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.