तांडव सीरिजच्या निर्मात्यांना आदित्यानाथांचा इशारा : किंमत मोजावीच लागणार
वृत्तसंस्था / लखनौ
‘तांडव’ या वेबसीरिजवर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप होत असून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याच्या निर्मात्यांना कठोर इशारा ला आहे. मनोरंजनाच्या नावाखाली हिंदू धर्माचा अपमान करून भावना दुखावणाऱयांच्या विरोधात सरकार कठोर कारवाई करणार असल्याचे योगींनी म्हटले आहे.
तांडवचे निर्माते आणि अमेझॉन इंडियाच्या कंटेंट प्रमुखांना धार्मिक भावना दुखावण्याची किंमत मोजावीच लागेल, असे योगींनी म्हटले आहे. यापूर्वी योगींचे माध्यम सल्लागार शलभमणि त्रिपाठी यांनी तांडवचे निर्माते आणि कलाकारांना अटकेसाठी तयार राहण्याचा इशारा दिला होता.
लखनौच्या हजरतगंज पोलीस स्थानकात सीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माते हिमांशू कृष्ण मिश्रा, लेखक गौरव सोलंकी, अभिनेते सैफ अली खान आणि मोहम्मद जीशान अयूब तसेच अमेझॉन इंडियाच्या ओरिजिनल कंटेंट प्रमुख अपर्णा पुरोहित यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. तेथील 4 सदस्यीय पथक तपासासाठी मुंबईत पोहोचले आहे.
अली अब्बास जफरचा माफीनामा
वाद वाढल्याचे पाहून सीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर आम्ही नजर ठेवून आहोत. ही पूर्णपणे काल्पनिक कथा आहे. लोकांच्या भावनांना ठेच पोहोचविण्याचा आमचा उद्देश नव्हता, असे अब्बास यांनी नमूद पेले आहे.