10 लाखाचे नुकसान : गिरी येथील घटना
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसाहून वेर्णाच्या दिशेने लोखंडी सळय़ा घेऊन जाणाऱया धावत्या ट्रकला गिरी पुलाजवळ सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागल्याने ट्रक जळून पूर्णतः खाक झाला. या आगीत सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती म्हापसा अग्निशमन दलाने दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जीए-04-टी-9495 सकाळी वेर्णा येथे लोखंडी सळय़ा घेऊन जात असताना गिरी पुलाजनिक पोचल्यावर दर्शनी भागातून धूर येऊन आगीचे लोळ बाहेर पडू लागले व आगीने पेट घेतला असता चालकाने धावत्या गाडीतून बाहेर उडी घेऊन आपला जीव वाचविला. घटनेची माहिती म्हापसा अग्निशमन दलास दिल्यावर उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही आह विझविण्यात आली.