बेळगाव : / प्रतिनिधी
बेळगावहून बैलहोंगलकडे जाणाऱया धावत्या मालवाहू रिक्षाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी दुपारी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. गाडीच्या इंजिनने पेट घेतल्याने समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे.
संपगाव (ता. बैलहोंगल) येथील नागाप्पा फकिराप्पा तळवार यांच्या मालकीची ही रिक्षा आहे. या घटनेत कोणतीही जीवितनाही झाली नसली तरी इंजिन जळाल्याने साधारण 1 लाख रुपयांचा फटका बसला आहे. सदर घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे व्ही. एस. टक्केकर यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्मयात आणली.