प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यातील धावपटू सुदेष्णा शिवणकर हिची पंजाबमधील पटियाला येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. हे शिबीर 23 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत होणार असून, यासाठी निवडक खेळाडूंमध्ये सुदेष्णाची निवड झाली आहे.
देशभरातील निवडक ऍथलेटिक खेळाडूंमधून सुदेष्णाची झालेली निवड अभिनंदनीय असून, याच प्रशिक्षण कालावधीमध्ये 31 जुलै ते 2 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये तिथेच 19 वी ज्युनिअर ऍथलेटिक फेडरेशन कप 2021 ही 20 वर्षाखालील वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. त्यामधून निवड झालेल्या खेळाडूंना केनियात होणाऱ्या वर्ल्ड ऍथलेटिक ज्युनियर चॅम्पियन 2021 या आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.
सुदेष्णाला माजी तालुका क्रिडा अधिकारी बळवंत बाबर सर मार्गदर्शन मिळत आहे. सुदेष्णाच्या निवडीबद्दल तिचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव, प्रा. गायकवाड, गुजर व माणदेशी चॅम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी अभिनंदन केले आहे.