बेळगाव : बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असणारी धोकादायक झाडे हटविण्याची मागणी वनखात्याकडे करून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील मध्यवर्ती भागात कपिलेश्वर रोडवरील घर क्र. 22 येथील परसातील एक झाड अत्यंत धोकादायक बनले आहे. त्यामुळे घरांचे नुकसान तसेच जीवितहानी होण्याची शक्यता आहे. याबाबत येथील रहिवाशांनी 2013 तसेच 2019 साली धोकादायक झाड हटवावे म्हणून फोटोसह अर्ज केला होता. मात्र अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही. मात्र वनखात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन धोकादायक झाड हटविण्याची मागणी होत आहे.
Previous Articleसमता भगिनी मंडळातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम
Next Article महिला विद्यालयात बक्षीस वितरण सोहळा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.