प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राणी चन्नम्मा चौक ते संगोळ्ळी रायण्णा चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावर असलेल्या जुनाट वृक्षांच्या फांद्या वाहनांना लागण्याचा धोका आहे. त्यामुळे सदर झाडांच्या फांद्या हटविण्याचे काम रविवारी करण्यात आले.
रस्त्याचे काँक्रिटीकरण करून दुतर्फा पेव्हर्स ब्लॉक घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे रस्त्याची उंची वाढली आहे. परिणामी या रस्त्या शेजारी असलेल्या जुनाट वृक्षांच्या फांद्या वाहनांना लागत आहेत. त्याचप्रमाणे मध्यभागी दुभाजक घालण्यात येत असून फांद्या पथदीपांना अडचणीच्या ठरत आहेत. पथदीप बसविल्यानंतर प्रकाश पडण्यास फांद्यांचा अडसर होण्याची शक्मयता आहे. काही वडाच्या झाडांच्या पारंब्या रस्त्यावर लेंबकळत असल्याने वाहनधारकांना धोकादायक आहे. यापूर्वी काही जुनाट वृक्ष हटविण्यात आले होते. पण काही झाडे तशीच राहिल्याने झाडांच्या फांद्या हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. रविवारी वाहतुकीची वर्दळ कमी असल्याने झाडाच्या फांद्या हटविण्याचे काम तसेच धोकादायक वृक्ष हटविण्याची कारवाई करण्यात आली.