45 अंश सेल्सिअस तापमान, प्रत्येक क्षणावर मृत्यूचे सावट
सर्वसाधारणपणे विवाहानंतर हनिमूनसाठी कुठल्याही सुंदर ठिकाणी जात असतात. परंतु एका ट्रव्हल इन्फ्लुएंसरने विवाहानंतर फिरण्यासाठी जगातील सर्वात निर्जन ठिकाण निवडले आहे. टॅव्हल इन्फ्लुएंसरने सहारा वाळवंटादरम्यान जगातील सर्वात धोकादायक 2 किलोमीटर लांबीच्या आयर्न ट्रेनवर स्वतःच्या विवाहाची छायाचित्रे काढून घेतली आहेत.
दांपत्याने हे फोटोशूट आफ्रिकेच्या मॉरिटानियामध्ये स्वतःच्या हनिमूनदरम्यान करविले आहे. क्रोएशियाच्या क्रिस्टिजन इलिसिक (35 वर्षे) आणि त्यांची ब्लॉगर पत्नी एंड्रिया ट्रगोवेसेविक (29 वर्षे)ने जगातील सर्वात अजब आणि धोकादायक पोस्ट-वेडिंग फोटोशूट करविले आहे.
मालगाडीवर घालविले 2 तास
नवविवाहित दांपत्य स्वतःच्या हनिमूनला ‘अनोखा’ करू इच्छित होता. हे दांपत्य यासाठी कठोर परिस्थितींदरम्यान 20 तासांच्या ‘अस्वच्छ’ यात्रेसाठी भरभक्कम, अत्यंत लांब आणि जगातील सर्वात धोकादायक मालगाडी, ट्रेन टू डेझर्टवर रवाना झाले आहे. ही मालगाडी अत्यंत धोकादायक मानली जाते. कधीकधी प्रवासी वाहनांनाही या मालगाडीशी जोडले जाते. मालवाहू डब्यांच्या वर मोफत प्रवास करणे लोक पसंत करतात. याचमुळे येथे रेल्वेतून कोसळण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडतात. वाळवंटाचे तापमान दिवासा 45 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आणि रात्री शून सेल्सिअसपेक्षा कमी होते.
सोशल मीडियावर छायाचित्रे शेअर
क्रिस्टिजनने या छायाचित्रांना स्वतःच्या इन्स्टाग्राम पेजवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्ससोबत शेअर केले आहे. आम्ही विवाह केल्यावर लोकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळय़ा प्रकारच्या हनिमूनवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे क्रिस्टिजन यांनी सांगितले.
काहीतरी वेगळे करण्याची इच्छा
आमचा हनिमून अनोखा आणि विशेष ठरावा अशी आमची इच्छा होती. पांढरी वाळू, समुद्र आणि नारळांच्या झाडांदरम्यान हे शक्य नव्हते असे या दांपत्याने म्हटले आहे. काहीतरी वेगळे करण्याकरता आम्ही मॉरिटानियाची निवड केल्याचे ट्रव्हल इन्फ्लुएंसरने सांगितले आहे. मॉरिटानियाची ट्रेन टू डेझर्ट एक अटलांटिक किनारयावर नौआदिबौमध्ये बंदरापासून जौराटमध्ये लोहखाणीपर्यंत दररोज सेवेचे संचालन करते.