ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. दिवसेंदिवस दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासात 44 हजार 658 नवे रुग्ण आढळून आले. तर 496 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 कोटी 26 लाख 03 हजार 188 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 4,36,861 जणांनी आपला जीव गमावला आहे.
गेल्या 24 तासांत 32 हजार 988 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 कोटी 18 लाख 21 हजार 428 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 3 लाख 44 हजार 899 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट 2.10 टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या 63 दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी रेट 2.45 टक्के असून तो गेल्या32 दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.
दरम्यान, काल दिवसभरात 79 लाख 48 हजार 439 लसींचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत देशातील 61 कोटी 22 लाख 08 हजार 542 जणांना लस देण्यात आली आहे.
आतापर्यंत देशात 51 कोटी 49 लाख 54 हजार 309 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 18 लाख 24 हजार 931 कोरोना चाचण्या गुरूवारी (दि. 26 ऑगस्ट 2021) एका दिवसात करण्यात आल्या.
‘या’ पाच राज्यांमध्ये मागील 24 तासात आढळले सर्वाधिक नवे रूग्ण :
- केरळ : 31,645
- महाराष्ट्र : 5,131
- आंध्र प्रदेश : 1,622
- तामिळनाडू : 1,106
- कर्नाटक : 1,224