ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटन मध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. मागील 24 तासात 42,302 नवे रुग्ण आढळून आले. तर 49 जणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी नंतरची ही एका दिवसातील सर्वात मोठी संख्या आहे. त्यावेळी 55,761 रुग्णांची नोंद झाली होती. तर मंगळवारी कोरोनाचे 36,660 रुग्ण तर 50 जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे 19 जुलै पासून लॉकडाऊन संबंधित सर्व निर्बंध हटविणार आहे.
ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी सांगितले की, ब्रिटनमधील दोन तृतीयांश वयस्कर व्यक्तींना कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी लस घेतलेल्या नागरिकांचे धन्यवाद देखील मानले आहेत. ते म्हणाले, लसीकरण हीच आमची मोठी ढाल आहे. लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करणे हेच आमचे आताचे लक्ष्य आहे.
- जगात कोरोना रुग्णांची संख्या 18.19 कोटींवर
मागील 24 तासात जगात कोरोनाचे 5.54 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3.70 लाख रुग्ण बरे झाले. 8,715 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जगातील एकूण रुग्णांची संख्या 18.91 कोटींवर पोहोचली असून त्यातील 17.27 कोटी रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 40.74 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.