ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात सर्वाधिक म्हणजेच 1,540 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. या सोबतच कोरोना रुग्णांनी 35 हजारांचा टप्पा गाठला आहे. तर राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 35 हजार 947 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 10,535 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 1,540 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 97, बागेश्र्वर 84, चमोली 31, चंपावत 0, देहरादून 429, हरिद्वार 363, नैनिताल 118, पौरी गरवाल 51, पिथोरगड 55, रुद्र प्रयाग 7,तेहरी गरवाल 12, यू एस नगरमधील 246 आणि उत्तर काशीमधील 47 जणांचा समावेश आहे.
- आतापर्यंत 447 जणांचा मृत्यू
बुधवारी 1192 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशातील 24,277 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67.54 टक्के इतके आहे. तर सध्या 11 हजार 068 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 447 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.