ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. रविवारी उत्तराखंडात 265 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्येने 12 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर गेल्या 24 तासात 5 जणांनी आपला जीव गमावला आहे. माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मृत पावलेल्या 5 जणांमध्ये एम्स ऋषिकेश मधील 3 जण, सुशीला तिवारी मेडिकल कॉलेज मधील एक आणि दून मेडिकल कॉलेज मधील एकाचा समावेश आहे. तर आता पर्यंत उत्तराखंडात एकूण 152 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
काल आढळलेल्या रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 3, बागेश्र्वर 0, चमोली 25, चंपावत 03, देहरादून 49, हरिद्वार 55, नैनिताल 21, पौरी गरवाल 3, पिथोरगड 0, रुद्र प्रयाग 0, तेहरी गरवाल 32, यू एस नगरमधील 21 आणि उत्तर काशीमधील 23 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील एकूण 12175 रुग्णांपैकी आतापर्यंत 8100 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.53 टक्के इतके आहे. तर सध्या 3879 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.