ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. आता पर्यंत प्रदेशातील रुग्णांनी 35 हजारांचा आकडा गाठला असून मागील चोवीस तासात 655 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 35 हजार 135 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 158 आणि काश्मीर मधील 497 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 7 हजार 743 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 1718 आणि काश्मीरमधील 6025 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 26 हजार 721 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 5991 रुग्ण जम्मूतील तर 20730 जण काश्मीरमधील आहेत. तर आतापर्यंत 671 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 57 जण तर काश्मीरमधील 614 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत 4 लाख 48 हजार 697 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 44 हजार 537 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 7 हजार 743 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.