- 25, 569 ॲक्टीव्ह रुग्ण
ऑनलाईन टीम / नागपूर :
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. नागपूर शहरात तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूरमध्ये दिवसभरात 3,235 नवे कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी 3 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 85 हजार 787 वर पोहोचली आहे. सद्य स्थितीत 25, 569 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.आज दिवसभरात 1245 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
तर आतापर्यंत 1 लाख 55 हजार 655 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 4,563 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.