ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात 2,039 नव्या रुग्णांची नोंद झाली. 35 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 03 हजार 049 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात 1,274 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,03,049 रुग्णांपैकी 1 लाख 83 हजार 557 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 172 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 13, 320 ॲक्टिव्ह रुग्ण
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 54 लाख 60 हजार 889 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 13 हजार 320 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 283 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 27 जण व्हेंटिलेटरवर आहेत.