ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. देशात रुग्ण संख्येने 18 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे देशात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. देशात मागील 24 तासात 52 हजार 972 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 771 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18 लाख 03 हजार 696 वर पोहचली असून, मृतांची संख्या 38 हजार 135 एवढी आहे.
सध्या देशात 5 लाख 79 हजार 357 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 11 लाख 86 हजार 203 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 4 लाख 41 हजार 228 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 2 लाख 57 हजार 613, दिल्ली 1 लाख 37 हजार 677, गुजरातमध्ये 63 हजार 562, मध्यप्रदेश 33 हजार 535, आंध्र प्रदेश 1 लाख 58 हजार 764, बिहार 57 हजार 024, राजस्थान 43 हजार 804, उत्तरप्रदेश 92 हजार 921 तर पश्चिम बंगालमध्ये 75 हजार 516 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.