- एकूण रूग्ण संख्या 76 वर; आतापर्यंत 5 जणांनी गमावला जीव
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण होत आहे. आता दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या ही 5 ते 6 हजारांच्या आसपास आढळून येत आहे. ही आकडेवारी जरी जास्त असेल तरी गेल्या काही दिवसांपूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत खूपच कमी आहे. मात्र, असे असले तरी आता चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. राज्यात आज दिवसभरात डेल्टा प्लसचे दहा नवीन रूग्ण आढळून आले आहे. तर, यामुळे आता राज्यभरातील एकूण रूग्ण संख्या 76 वर पोहोचली आहे.
आज आढळलेल्या दहा रूग्णांमध्ये कोल्हापूरमध्ये 6, रत्नागिरी 3 आणि सिंधुदुर्गमधील एका रूग्णाचा समावेश आहे. तर आतापर्यंत 5 जणांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये रत्नागिरीतील दोन, तर मुंबई, बीड आणि रायगड येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोणत्या जिह्यात किती रूग्ण ?
रत्नागिरी 15
जळगाव 13
मुंबई 11
ठाणे 6
पुणे 6
कोल्हापूर 7
पालघर 3
रायगड 3
नांदेड 2
गोंदिया 2
सिंधुदुर्ग 2
आणि चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, आणि बीडमधील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.