- सक्रीय रुग्णांची संख्या 1 लाख 10 हजार 485 वर
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासात 15,817 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 56 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 22 लाख 82 हजार 191 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 52 हजार 723 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 11,344 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 21 लाख 17 हजार 744 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.79 % आहे. सद्य स्थितीत राज्यात 1 लाख 10 हजार 485 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 73 लाख 10 हजार 586 नमुन्यांपैकी 22 लाख 82 हजार 191 (13.18%) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 5 लाख 42 हजार 693 क्वारंटाईनमध्ये असून, 4 हजार 884 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.