ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात 327 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर आतापर्यंत 23 हजार 360 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 246 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- 20,139 पोलीस कोरोनामुक्त
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 23,360 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2563 पोलीस अधिकारी आणि 20,797 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 20 हजार 139 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 2173 पोलीस अधिकारी आणि 17,966 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
- आत्तापर्यंत 246 पोलिसांचा मृत्यू
सद्यस्थितीत राज्यात 2975 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 365 पोलीस अधिकारी आणि 2610 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 246 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 25 पोलीस ऑफिसर आणि 221 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.