ऑनलाईन टीम / नाशिक :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात उद्यापासून बारा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी आज म्हणजेच मंगळवारी नाशिककरांनी अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत तुफान गर्दी केली आहे. सकाळपासूनच किराणा दुकाने, पीठ गिरणी आणि रेशन दुकानाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये उद्यापासून दहा दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात शहरातील सर्व दुकाने बंद असतील. हॉस्पिटल आणि मेडिकल सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
त्यामुळे नाशिक मधील नागरिकांनी आज सकाळपासूनच विविध दुकानात समान घेण्यासाठी गर्दी केली होती. काल तर मासे, अंडी घेण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. यावेळी रस्त्यालगत पार्किंग झाल्याने वाहनांची कोंडी यावेळी पाहायला मिळाली. दरम्यान, अनेक नागरिकांनी यावेळी मास्क देखील घातला नव्हता.