संस्कृतमध्ये समालोचन : पॅव्हेलियनमध्ये हर हर महादेवचा जयजकार
मोक्षनगरी काशीची प्रत्येक छटा अनोखी असते, याच्या रंगात जगातील प्रत्येक रंग सहजपणे सामावून जातो. राग विराग आणि अनुरागची नगरी काशीमध्ये खेळही अनोख्या आणि परंपरेच्या रसात बुडालेला दिसून येतो. याचनुसार गुरवारी क्रिकेटचे चाहते धोतर नेसलेल्या बटुंकांनी बॅट हातात घेत चेंडू सीमापार पोहोचविला असता पॅव्हेलियनमध्ये हर हर महादेवचा जयजयकार दिसून आला.
या अनोख्या क्रिकेट सामन्याचे बहुतांश प्रेक्षकही वेदपाठी बटुकच होते. सामन्यादरम्यान संस्कृतमध्ये चतुर धावनांक (चौकार), षड् धावनांक (षटकार), फलकधारक (फलंदाज), कंदुक प्रक्षेपक (गोलंदाज) यासाख्या शब्दांसह झालेल्या समालोचनाने या सामन्याला अधिकच अनोखे स्वरुप प्राप्त करून दिले.
संस्कृत भाषेतील समालोचन ऐकून पुराणांपेक्षाही अधिक जुनी नगरी असलेल्या काशीत देववाणीच नव्हे तर द्वापर युगातील भगवान श्रीकृष्णाचा कालिंदीच्या तटावरील ‘कंदुक क्रीडे’चे दृश्यही जणू जिवंत झाल्याचा भास झाला. या सामन्यात बटुक स्वतःचा पारंपरिक वेश म्हणजेच धोतर, कुर्ता, टिळा आणि त्रिपुंडमध्ये फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण करताना तर पंचही भगव्या रंगात दिसून आले.
“कंदुक प्रक्षेपकः कंदुक प्रक्षिपति तदा फलक ताडकत्वेन तीव्रगत्या प्रहरति, कंदुक आकाश मार्गेण, गच्छन्, सीमा रेखातः बहिर्गतम षड धावनाकेंन कोष. उद्धाटितवान्’’ हा संस्कृतमधील श्लोक नसून क्रिकेट सामन्याचे समालोचन आहे. याचा अर्थ गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर फलंदाजाने मोठा प्रहार केल्याने तो आकाशाच्या मार्गे सीमापार म्हणजे षटकार ठोकला असा याचा अर्थ होतो.