वृत्तसंस्था/ बार्बाडोस
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट क्षेत्रातील सर्वात मोठा सुपरस्टार असल्याचे प्रतिपादन विंडीजचा अष्टपैलू ड्वेन ब्रेव्होने केले आहे.
विंडीजचा ड्वेन ब्रॅव्होने याने इन्स्टाग्रामद्वारे झिंबाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज पी. बांग्वाशी लाईव्ह चाट वरील मत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीशी कोणत्याही क्रिकेटपटूला सहजपणे संपर्क साधता येतो, असेही त्याने म्हटले आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज संघात ब्रेव्होचा 2011 पासून समावेश आहे.
चेन्नई सुपरकिंग्जच्या यशाचे सर्व श्रेय धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना द्यावे लागेल. चेन्नई सुपर किंग्जच्या प्रँचायझीचा संपूर्ण विश्वास धोनी आणि फ्लेमिंग यांच्यावर असल्याने या संघाला कोणत्याही निर्णयासाठी बहिस्थ हस्तक्षेपाची जरूरी भासली नाही. ज्यावेळी निर्णय घ्यावयाचा असतो त्यावेळी फ्लेमिंग आणि धोनी एकत्रित येतात, असे चित्र अनेकवेळा पहावयास मिळाल्याचे ब्रॅव्होने सांगितले. संपूर्ण क्रिकेट क्षेत्रात धोनी ‘महान सुपरस्टार’ असून त्याने मोठा चाहता वर्ग निर्माण केला असल्याचे ब्रेव्होने महटले आहे.
2011 सालापासून ड्वेन ब्रेव्हो चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना एकूण 104 सामन्यात 121 बळी घेतले आहेत. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासामध्ये ब्रेव्होने 2013 आणि 2015 साली सर्वाधिक बळी घेत पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. चेन्नाई सुपर किंग्जने 2010, 2011 आणि 2018 साली असे तीनवेळा आयपीएल चषक जिंकला असून या संघाला हे यश कर्णधार धोनीने मिळवून दिले असल्याचे ब्रेव्होने म्हटले आहे. 38 वर्षीय धोनीने आपला शेवटचा सामना 2019 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर तो सध्या क्रिकेटपासून अलिप्त आहे. बीसीसीआयच्या चालू वर्षांच्या मध्यवर्ती करारातून धोनीला वगळण्यात आले आहे. आयसीसीच्या प्रमुख स्पर्धा जिंकणाऱया भारतीय संघाचे नेतृत्व धोनीने आतापर्यंत केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या कसोटी मानांकनात अग्रस्थानही मिळविल्याचे ब्रेव्होने म्हटले आहे.