प्रतिनिधी / सातारा
काल दिवसभर व रात्री झालेल्या धोम धरण परिसरातल्या पावसाने धोम धरण व्यवस्थापनाने नदी पात्रात रात्री आठ वाजल्यापासून पाणी सोडण्यास सुरुवात केली. विद्युतगृहातून 400 क्युसेक्स विसर्ग चालू करणे आला होता. रात्री 10:30 वा. वक्रद्वार उचलून नदीपात्रात अतिरीक्त 1हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला होता. तर सकाळी आठ वाजता 3हजार515 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे वाई येथील महागणपती मंदिराच्या लगत घाटाला पाणी लागले होते. सकाळी 10 वाजता पाऊस कमी झाला आहे.
गेल्या 24 तासात एकूण सरासरी 83.24 मि.मी. पाऊस
काल दिवसभरापासून आज सकाळी 8 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यात सरासरी 83.24 इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.
सातारा- 83.85 मि. मी.
जावली- 68.12 मि.मी.
पाटण- 69.64 मि.मी.
कराड- 100.69 मि.मी.
कोरेगाव- 57.89 मि.मी.
खटाव-84.17 मि.मी.
माण- 84.00 मि.मी.
फलटण- 94.33 मि.मी.
खंडाळा- 92.95 मि.मी.
वाई – 72.43 मि.मी.
महाबळेश्वर-122.75.