मनपासमोरील लाल-पिवळा बदलण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका कार्यालयासमोरील लाल-पिवळा झेंडा कळीचा मुद्दा बनला आहे. सदर ध्वज पोलीस संरक्षणात बसविण्यात आला होता. हा ध्वज खराब झाला असल्याने बदलण्याचा प्रयत्न दुराग्रही संघटनांनी सोमवारी सकाळी केला. यामुळे शहराची शांतता भंग होण्याची शक्मयता असल्याचे सांगून पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविले. तरीदेखील ध्वज बदलण्याचा अट्टहास धरल्याने कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लाल-पिवळा ध्वज फडकाविण्यात आला होता. हा ध्वज काढण्याची मागणी करण्यात आली होती. पण कानडी संघटनांच्या दबावाखाली असलेल्या प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. ध्वज काढल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्मयता असल्याने पोलिसांनी या ठिकाणी पहारा ठेवला होता.
सोमवारी अनलॉक झाल्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. पण कोरोनाच्या दुसऱया लाटेतून सावरत असताना ध्वज खराब झाल्याचे कारण पुढे करून तो बदलण्याचा प्रयत्न दुराग्रही संघटनांनी सोमवारी केला. त्यामुळे या ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविले. शहराची शांतता बिघडण्याची शक्मयता असून कायदा व व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, असे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. पण पोलिसांना न जुमानता ध्वज बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.