प्रतिनिधी /बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने हिंदू तिथीनुसार माघ शुक्ल सप्तमी या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन धर्मवीर संभाजी चौकात साजरा करण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे विभाग प्रमुख व म. ए. युवा समितीचे उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
प्रारंभी प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला. जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी पुढील फाल्गुन महिन्यात सुरू होणाऱया धर्मवीर बलिदान मास याबद्दल माहिती दिली. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी विश्वनाथ पाटील, अजित जाधव, चंद्रकांत चौगुले, अमोल केसरकर, अनंत चौगुले, विजय कुंटे, गजानन निलजकर, रोहीत येळ्ळूरकर, कपिल कामाण्णाचे, प्रशांत भारती, प्रशांत बिळगोजी, राहुल हणमंताचे, ओंकार पुजारी, वैभव धामणेकर, गिरीष पाटील, मारुती पाटील, जोतिबा चोपडे, संकेत सुतार, नितीन कुलकर्णी यासह इतर शिवभक्त उपस्थित होते.