नंदगड / वार्ताहर
मंगळवारी आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार आणखी 18 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 339 वर पोहचली असून आतापर्यंत 265 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या पाच महिन्यात तालुक्यातील जवळजवळ 7 हजार जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. आता थोडक्याच रुग्णांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. अशा परिस्थितीत तालुका संपूर्णपणे कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.
मंगळवारी सापडलेल्या 18 कोरोना बाधितांमध्ये खानापूर शहरातच 10 बाधीत सापडले असून येथील आंबेडकर गल्लीतील 65 वर्षीय महिला, दुर्गानगर येथील 40 वर्षीय महिला तर 45 व 40 वर्षीय पुरुष, बंडर गल्ली येथील 23 वर्षीय महिला, सरकारी दवाखाना येथील 52 वर्षीय महिला, पोलीस स्टेशन येथील 28 वर्षीय पुरुष तर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 45 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन येथे 50 वर्षीय पुरुष तसेच शहरातील इतर भागात 37 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. उर्वरित 8 कोरोनाबाधित तालुक्याच्या ग्रामीण भागातील असून त्यामध्ये गांधीनगर येथील 21 वर्षीय महिला, बिडी येथील 62 वर्षीय पुरुष, इटगी येथील 36 वर्षीय पुरुष, असोगा येथील 32 वर्षीय महिला, शिंपेवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, जटगा येथील 74 वर्षीय वृद्ध, कामशिनकोप्प येथील 25 वर्षीय महिला तर लक्केबैल येथील 37 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
नंदगड परिसरात सार्वजनिक गणपतांचे विसर्जन
एक गाव एक गणपतीची परंपरा असलेल्या नंदगड गावच्या सार्वजनिक गणपतीचे विसर्जन मंगळवारी सायंकाळी झाले. विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोजकीच उपस्थिती लाभली असली तरी उत्साह मात्र अमाप दिसून येत होता.
खानापूर तालुक्मयातील मोठे आणि महत्त्वाचे गाव म्हणून नंदगड गावची ओळख आहे. गेल्या 70 वर्षांपासून या गावात एक गाव एक गणपतीची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. गावच्या प्रमुख बाजारपेठेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती पूजली जात होती. परंतु यावषी कोरोनाच्या संकटामुळे कॉलेज रोडवरील बसवेश्वर मंदिरात याची स्थापना केली गेली.
गणेश चतुर्थीदिवशी मंडळाचे पदाधिकारी व काही मोजक्मयाच भक्तांच्या उपस्थितीत गणपतीची मिरवणूक व स्थापना करण्यात आली. त्यानंतर रोज सकाळ आणि संध्याकाळी मोजक्मयाच लोकांच्या उपस्थितीत पूजा अर्चा करण्यात आली. दरवषी मनोरंजनाचे तसेच समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जात होते. खेळाडू व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही दरवषी मंडळ करत होते. अनेक कलागुणांना आणि कौशल्यांना वाव देण्याची परंपरा मंडळाने सदोदित ठेवली होती. पण कोरोनामुळे यावषी या सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात आला होता.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कॉलेज रोडवरील श्री बसवेश्वर मंदिरापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. कामाणा खूटपासून मुख्य बाजारपेठ ते रायापूर रस्त्यावरील कमल तलावपर्यंत विसर्जन मिरवणूक आली. तेथे मूर्तीची पूजा करण्यात आली व सायंकाळी उशिरा मूर्तीचे तलावात विसर्जन करण्यात आले.
यावषीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला मोजक्मयाच लोकांची उपस्थिती लाभली असली तरी विसर्जन मिरवणुकीचा उत्साह मोठय़ा प्रमाणात दिसून येत होता. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषी लवकर या’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी मोठय़ा प्रमाणात फटाक्मयांची आतषबाजी करण्यात आली.
ग्रामीण भागातील सार्वजनिक गणपतींचे विसर्जन
नंदगड परिसरातील गावात सार्वजनिक गणपती पुजण्यात येतो. त्या-त्या गावातून मंगळवारी सायंकाळी सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. श्रीमूर्ती ट्रक्टरवर ठेवून मोजक्मयाच भक्तांच्या उपस्थितीत गणपतींचे विसर्जन त्या-त्या गावच्या तलावांतून तसेच काही ठिकाणी नदी-नाल्यांतून करण्यात आले.
घरगुती गणपतींचे विसर्जन
नंदगड परिसरात काही जणांनी दीड दिवसाचे तर काही जणांनी पाच, सात, नऊ तर काहींनी मंगळवारी अनंत चतुर्दशीला घरगुती गणपतांचे विसर्जन केले. घरगुती गणपती विसर्जनासाठी काहींनी आपापल्या गणपती मूर्ती ट्रक्टरमधून विसर्जनस्थळी आणल्या होत्या. काहींनी डोक्मयावरून व दुचाकीवरूनही गणपती मूर्ती आणल्या होत्या. यावेळी घरातील आबालवृद्धांसह सर्वजण आपल्या लाडक्मया बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जनस्थळी हजर होते.