नंदगड : गावच्या बाजारपेठेचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱया चावडी इमारतीजवळ कचरा व घाणीचे साम्राज्य तसेच खड्डा पडल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. नंदगडमध्ये दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात आपला माल विक्री करण्यासाठी अनेक विपेते येत असतात. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत बाजार राहिल्याने बाजारात आणलेला शिल्लक माल व कचरा बाजारपेठेत पडलेला असतो. गुरुवारी या बाजारपेठेची स्वच्छता केली जाते. गुरुवारी दुपारपर्यंत बाजारपेठेतील कचऱयाची स्वच्छता करण्याची आजपर्यंतची पद्धत आहे. परंतु मागील गुरुवारी दुपारनंतरही ठिकठिकाणी कचऱयाचे ढीग दिसून आले. त्यामुळे आज कचरा उचलण्यास विसरण्यात आले की, काय असाच प्रश्न ग्रामस्थांना व या रस्त्यावरून जाणाऱयांना वाटू लागला.येथील चावडीजवळ मोठा खड्डा पडला आहे. त्या खड्डय़ात पावसाचे पाणी साचले आहे. बाजारातून वेगाने येणारी वाहने खड्डय़ात अडकून लहान-सहान अपघात घडून वाहनचालकांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे त्वरित हा खड्डा बुजवावा, अशी मागणी वाहनधारकातून केली जात आहे. पावसाळा असल्याने कचऱयामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन रोगराई पसरण्याचा संभव असतो. त्यामुळे मुळातच स्वच्छतेकडे विशेष भर देणे गरजेचे आहे.
Previous Articleकणबर्गी हिंडाल्को रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य
Next Article तिवोली पुलाची समस्या मिटणार कधी?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.