प्रतिनिधी / बेळगाव
नंदिहळळी येथील वकील मारुती कामाण्णाचे यांनी आपल्या शेतामध्ये शुभांगी जातीच्या भाताची पेरणी केली. त्या भाताला वेळेत शेणखत, कॉम्प्लेक्स या खतांची मात्रा दिली. याचबरोबर वेळेत भांगलण व इतर कामे केली. त्यामुळे शुभांगी भात जोमात आले असून विविध कंपन्यांकडून ऍड. मारुती कामाण्णाचे यांचा सत्कार करण्यात आला.
मारुती कामाण्णाचे हे वकील आहेत. मात्र यावषी कोरोनामुळे त्यांनी अधिक भर शेतीवर दिला. लॉकडाऊन असल्यामुळे तसेच न्यायालयीन कामकाज बंद असल्यामुळे शेतीवर भर दिला आणि त्यामध्ये शुभांगी भाताची पेरणी केली. त्यांनी इतर मजुरांच्या साहाय्याने सर्व कामे वेळेत केली. त्यामुळे भात जोमात आले असून लवकरच त्याची मळणी केली जाणार आहे. विविध कंपन्यांनी शेतामध्ये जावून त्यांच्या भाताची पाहणी केली. तसेच उत्तमप्रकारे भात आल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. शुभांगी भाताचे लोंब देखील लांब असून यावषी विक्रमी उत्पादन होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे. या सत्कारावेळी एम. एन. इनामदार व इतर शेतकरी उपस्थित होते.