पुढील 5 दिवसापर्यंत करणार वास्तव्य
पश्चिम बंगालमधील हॉटसीट ठरलेल्या नंदीग्राममध्ये दुसऱया टप्प्याच्या अंतर्गत 1 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. येथील स्थानिक आमदार आणि भाजप नेते सुवेंदु अधिकारी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. स्वतःसमोरील तीव्र आव्हान पाहता ममता बॅनर्जी पुढील 5 दिवसांपर्यंत नंदीग्राममध्ये तळ ठोकणार आहेत. 1 एप्रिल रोजी मतदान होईपर्यंत ममतादीदी तेथेच राहणार आहेत. या 5 दिवसांदरम्यान त्यांच्या अनेक प्रचारसभा होणार आहेत.
भाजपची मोठी तयारी
नंदीग्राम मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी तृणमूल काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. तर भाजपचे सर्व दिग्गज नेते या मतदारसंघावर विशेष लक्ष देत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने व्यापक तयारी केली आहे. पुढली दोन दिवसांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा नंदीग्राममध्ये रोड शो होणार आहे. भाजपच्या व्युहनीतीला प्रत्युत्तर म्हणून ममता बॅनर्जी मतदानापर्यंत नंदीग्राममध्ये वास्तव्य करणार आहेत.