प्रतिनिधी/ पणजी
गोवा सरकारने राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर केले असून यंदा एकूण 9 जणांना हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
प्राथमिक शिक्षकांच्या पुरस्कारामध्ये उत्तर गोव्यात अविनाश पारखे, तर दक्षिण गोव्यासाठी अमिता शामा एस. एन. देसाई यांना प्राप्त झाला आहे. माध्यमिक शिक्षकांसाठी असलेल्या पुरस्कारांमध्ये उत्तर गोव्यात गोपाळ सावंत व नंदा माजिक यांना तर दक्षिण गोव्यासाठी श्रीकृष्ण वझे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर मोनिका कोयेल्लो उत्तर गोवा तसेच मारिया मुरेंडा मिरांडा या दक्षिण गोव्यातील शिक्षिकेला हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उच्च माध्यमिकसाठी विठोबा बगळी व उच्च माध्य. प्राचार्यसाठीचा पुरस्कार राजीव देसाई यांना प्राप्त झाला आहे. लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.