ऑनलाईन टीम / छत्तीसगड :
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात उसूर ब्लॉकच्या पुटकेल जंगलात सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सहायक कमांडंट शहीद झाले. तर एक जवान जखमी झाला आहे. आयजी बस्तर पी सुंदराज यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
एस बी तिर्की असे शहीद झालेल्या असिस्टंट कमांडंटचे नाव आहे. दरम्यान, उसूर ब्लॉकच्या पुटकेल जंगलात सीआरपीएफ 168 बटालियन आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येते.