आनंद राय यांच्या चित्रपटासाठी निवड
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने अत्यंत कमी काळात मोठी प्रसिद्धी मिळविली आहे. सोशल मीडियावर सारा अत्यंत सक्रीय असते. तिने आता अभिनयाद्वारे दिग्दर्शक आनंद एल. राय यांचे मनही जिंकले आहे. राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटातील काम पूर्ण केले आहे. अक्षय कुमार आणि धनुष देखील या चित्रपटात आहे.
राय यांनी स्वतःच्या पुढील चित्रपटासाठी साराशीच संपर्क साधला आहे. या चित्रपटाचे नाव ‘नखरेवाली’ असून यात सारा मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटात नायकाच्या भूमिकेत विक्की कौशलचा भाऊ सनी दिसून येऊ शकतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय नव्हे तर राहुल सांकल्या करणार आहेत. यापूर्वी 2019 च्या भांगडा पा ले या चित्रपटात सनी दिसून आला होता. याचबरोबर शिद्द चित्रपटात अभिनेत्री राधिका मदनसोबत सनी झळकणार आहे. दुसरीकडे विक्की कौशलसोबत ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ चित्रपटात सारा अली खान दिसून येणार आहे.