ओटवणे / प्रतिनिधी-
सावंतवाडी नगरपालिकेच्या लवकरच सुरू होणाऱ्या कोविड केअर सेंटरसाठी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी संरक्षक साहीत्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन करताच सावंतवाडी मेडिकल असोसिएशन तात्काळ प्रतिसाद देत या नियोजित कोविड सेंटर साठी 100 PPE किट, 20 लिटर सॅनिटायझर, 100 N95 मास्क, 8 फेस शिल्ड, 4 cadaver wrapper bags, 4 स्प्रेएर आणि सर्जिकल ग्लोव्हज आदी कोविंड यंत्रसामुग्री पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या सुपूर्द केली. यावेळी सावंतवाडी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ राजेश नवांगुळ, डॉ मिलिंद खानोलकर, डॉ कश्यप देशपांडे, डॉ संजय दळवी उपस्थित होते.