प्रतिनिधी / कोल्हापूर
नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार 29 रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 11.15 वा. आर. एम. मोहिते हेलिपॅड, मगराईची वाडी, वडगाव येथे आगमन व तेथून वडगावकडे प्रयाण. सकाळी 11.25 वा. कै. बळवंतराव आर्जोजीराव यादव यांच्या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती लावतील.
तसेच दुपारी 12 वा. सुबराव गवळी तालीम मंडळ, कोल्हापूर या संस्थेच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन व पायाभरणी समारंभास उपस्थिती लावतील तर दुपारी 12.30 वा. शिवसेना कोल्हापूर शहर कार्यालय उद्घाटन. दुपारी 1.30 वा. कोल्हापूर येथून वडगावकडे प्रयाण करतील दुपारी 1.45 वा. आर.एम. मोहिते हेलिपॅड, मगराईची वाडी, वडगाव येथे आगमन व तेथून हेलिकॉप्टरने माणगाव जि. रायगडकडे प्रयाण करतील.