प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात विकास कामांच्या अनुषंगाने पालिकेच्या स्थायी समितीची सभा पार पडली. त्या सभेत अजेंडय़ावर तब्बल सात विषय हे स्टील बेंच पुरवण्याचे होते. प्रभाग 1 ते 15 आणि हद्दवाढीतील शाहुपूरी, विलासपूर आणि खेड या तीन भागात नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच पुरवण्यासाठी नगराध्यक्षांचा राखीव 15 टक्के फंडातून सुमारे 17 लाख 53 हजार 920 रुपयांचा निधी त्याकरता खर्च होणार आहे. एवढे मोठे काम जर एकाच विषयात घेतले असते तर टेंडर प्रक्रिया राबवणे अवघड झाले असते. याकरता प्रभागनिहाय विभागणीकरुन तीन लाखाच्या आतील विषय बनवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणी ठेकेदार ओळखीचा असावा, अशी शक्यता नविआकडून नगरसेवक अविनाश कदम यांनी व्यक्त केली आहे.
सातारा शहरातील बहुतांशी सर्वच रस्ते खराब झालेले आहेत. त्या रस्त्यावरुन चालणेही अवघड झाले आहे. अगोदर रस्ते करुन घ्या मग नागरिकांना बसायला तेथे बंच द्या अशी भावना सातारा शहरातील सर्वसामान्य सातारकरांची सध्या आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये नगराध्यक्षांच्या राखीव 15 टक्के फंडातून प्रभाग 1 ते 5 मध्ये स्टील बेंच बसवण्याच्या कामासाठी 2 लाख 92 हजार 320 रुपये, प्रभाग 6 ते 10 मध्ये नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच 2 लाख 92 हजार 320 रुपये, प्रभाग 11 ते 15 मध्ये नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच बसवण्याकरता 2 लाख 92 हजार 320 रुपये, दरे खुर्द व मंगळवार पेठ परिसरातील नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच पुरवण्यासाठी 2 लाख 92 हजार320 रुपये, विलासपुर व शाहुपूरी हद्दीतील नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच पुरवण्यासाठी 2 लाख 92 हजार 320 रुपये, शाहुपूरी हद्दीत गेंडामाळ हुतात्मा उद्यानात नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच पुरवणे यासाठी 2 लाख 92 हजार 320 रुपये, खेड हद्दीत नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच पुरवणे 2 लाख 92 हजार 320 रुपये असा नगराध्यक्षांच्या राखीव 17 लाख 53 हजार920 रुपयांचा फंड नुसत्या स्टील बेंचवर खर्च होणार आहे. त्यावर सातारकर म्हणतात की अगोदर रस्ते करा मग बसायला बेंच आणा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
बाकडय़ाने काय साताऱयाचा विकास होत नाही
आजपर्यंत अशीच बाकडी देण्यात आली आहेत. आताही बाकडी देत आहेत. बाकडय़ाने काय सातारा शहराचा विकास होत नाही. मुलभूत सुविधा देणे गरजेचे आहे. बाकडय़ावाला कोणीतरी कॉन्ट्रक्टर जवळचा असावा. त्याकरता या साऱया उचापती आहेत. एकूण बाकडय़ांचा विषय काढला तर अडीच अडीच लाखाचे विषय काढण्यात आलेले आहेत. तो हिशोब दहा लाखाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे टेंडर प्रक्रिया अवघड झाली आहे. तसे का केले नाही.
अविनाश कदम नगरसेवक नविआ
आम्ही रस्त्याचे काम हाती घेणार आहोत
सातारा शहरात आम्ही सर्व रस्त्यांची कामे मंजूर पेलेली आहेत. लवकरच कामे हाती घेणार आहेत. केवळ बाकडी नाही तर इतरही विकास कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.