प्रतिनिधी/ निपाणी
निपाणीचे नगराध्यक्ष म्हणून प्रभाग क्र. 10 चे नगरसेवक जयवंत भाटले यांची नुकतीच निवड झाली. यानिमित्त येथील प्रभाग क्र. 10 मधील नागरिकांतर्फे हरिनगर येथे भाटले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी येथील श्री सिद्धीविनायक मंदिरात गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन आरती करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून नगराध्यक्ष भाटले यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून प्रभाग क्र. 10 सह संपूर्ण शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाटले यांनी दिली. याप्रसंगी श्री सिद्धीविनायक गणेश मंदिर, राजमुद्रा तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच हरिनगर, खानापूरे प्लॉटमधील नागरिक, महिला व युवक उपस्थित होते.