कुडाळ / प्रतिनिधी
राज्यातील 139 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत 27 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता मंत्रालयात मुंबई येथे प्रधान सचिव यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे. असे राज्याच्या नगर विकास विभागाचे उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांनी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक यांना एका आदेशाद्वारे कळविले आहे . त्यामुळे सिंधुदुर्गातील कुडाळ वाभवे वैभववाडी, देवगड, दोडामार्ग, नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार हे स्पष्ट होणार आहे .तसेच नगराध्यक्ष पदाचे दावेदार कोण ठरणार हेही निश्चित होणार आहे.