चिपळुणातील प्रकरणाच्या चौकशी समिती अहवालाकडे सर्वांचे लक्ष, महाविकास आघाडी अंदाज घेऊन पुन्हा म्हणणे सादर करण्याच्या तयारीत
प्रतिनिधी / चिपळूण
चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना बडतर्फ करण्याच्या महाविकास आघाडीच्या मागणी अर्जावर आता 21 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकाऱयांसमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत यासाठी नेमलेली चौकशी समिती आपला अहवाल सादर करण्याची शक्यता असल्याने या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच हा अहवाल पाहून आघाडी आपले पुन्हा म्हणणे सादर करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
खेराडे यांनी आजपर्यंत केलेल्या कामांपैकी 19 कामांवर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्ंाखsस या महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे. त्यांच्यामुळे नगर परिषदेच्या पैशाचा अपव्यय झाल्याचा आरोप करत त्यांना बडतर्फ करण्याच्या मागणीचा प्रस्ताव अर्ज जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे सादर केला आहे. या अर्जावर आतापर्यंत 2 सुनावण्या झाल्या असून काही दिवसांपूर्वी झालेल्या तिसऱया सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱयांनी तक्रार अर्जात आक्षेप असलेल्या कामाचे नाव व रक्कम लिहिली आहे. मात्र आरोपाचा उलगडा होत नसल्याचे आघाडीच्या वकिलांच्या लक्षात आणून दिले. तसेच तक्रारीची चौकशी करण्यासाठी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळे, नगरविकास विभागाच्या शिल्पा नाईक आदींची समिती नेमली होती.
या समितीतील अधिकाऱयांवर वेगवेगळय़ा कामांच्या चौकशीची जबाबदारी होती. त्यामुळे समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱयांकडे गेल्यानेच आता 21 रोजी चौथी सुनावणी होत असल्याचे दिसत आहे. या सुनावणीवेळी समितीचा अहवाल काय आहे, याची माहिती पुढे येण्याची शक्यता असून नगराध्यक्षांचे वकील आपले म्हणणे सादर करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे समितीचा अहवाल, नगराध्यक्षांच्या वकिलांचे म्हणणे याचा अंदाज घेऊन आघाडीचे वकीलही दुसऱयांदा आपले म्हणणे मांडण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.