भाजी विक्रेत्याना दिल्या सूचना
प्रतिनिधी/ सातारा
तब्बल दीड महिन्यानंतर सातारा शहरातील भाजी मंडई नियम व अटीवर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.शनिवारपासून मंडई सुरू करण्यात आली असल्याने या मंडईची पाहणी नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी केली.भाजी विक्री करणाया विक्रेत्यांना त्यांनी नियम पाळण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी रंजना गगे यांनी अतिक्रमण विभागाच्या कामाचे कौतुक केले.
नगराध्यक्षा सौ. माधवी संजोग कदम, मुख्याधिकारी सौ. रंजना गगे यांनी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज भाजी मंडई, महात्मा फुले भाजी मंडई, छत्रपती शाहु महाराज मार्केट यार्ड भाजी मंडई व जुना मोटर स्ट?ण्ड परिसर येथील भाजी मंडई सुरु करण्यासंदर्भात करण्यात येणाया साफसफाईची व स?निटायझेशनची पाहणी केली व तेथील भाजी विक्रेत्यांना स्वच्छतेची व सोशल डीस्टेन्सिग पाळण्यासंदर्भात सुचना केल्या. शिवाय नगर पालिकेकडून दोन आशा सेविकांची नियुक्ती केली आहे कि ज्या भाजी विक्रेत्यांचा दररोज पल्स आ?क्सीमीटर व थर्मामीटरने चेकअप करतील व त्याची नोंद ठेवतील त्यांना भाजी विक्रेत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी कस्तुरबा व आर्यांगल ह?स्पीटल ला भेटी दिल्या.