प्रतिनिधी / सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्यावतीने प्रभागात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.तसेच प्रभागाची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्ष सौ.माधवी कदम यांनी प्रभाग क्रमांक18,19 व 20 या तीन प्रभागाना भेट दिली.पालिका कर्मचायांना सूचना दिल्या.
कोरोनाला प्रादुर्भाव होऊ नये याकरता पालिका उपाययोजना करत आहे.त्याची पाहणी करण्यासाठी प्रभाग क्र. 18, 19 व 20 मध्ये नगराध्यक्षा माधवी कदम, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी केली.प्रभागामध्ये स्वच्छतेची पाहणी केली तसेच नागरीकांनी घरामध्ये रहावे विनाकारण बाहेर फिरु नये फाजी फळे दुध तुम्हाला घराजवळ मिळेल असे नियोजन केले आहे, अशा सुचना केल्या प्रभागामध्ये पाहणी करते वेळी नगरसेविका सोनाली नलवडे, नगरसेविका सुनिता पवार व नगरसेविका लिना गोरे उपस्थित होत्या.
पालिकेच्यावतीने आवाहन
लॉक डाऊनच्या काळात जे परराज्यातील कामगार सातारा शहरात आहेत.ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांची उपासमार होऊ नये याकरता शहरातील स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींनी यांनी यथाशक्ती मदत करावी, पालिकेकडे धान्य व साहित्य जमा करावे, जेणेकरून त्या नागरिकांना देता येईल, असे आवाहन उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी केले आहे.