पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला सन्मान
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या काळात सेवे देणे हे खुप मोठ कार्य आहे. सर्व शासकीय नियमांची अंमलबजावणी करत गेल्या सहा महिन्यांमध्ये अविरतपणे मेडिकलची सेवा देणाऱया पाटण तालुक्यातील नजीर मुलाणी यांचा कोरोना योद्या या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पाटण तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व मारूल हवेली येथील साहिल मेडिकलचे मालक नजीर मुलाणी यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात शासकीय सूचनांची अंमलबजावणी करून गेली सहा महिने अविरतपणे त्यांनी मेडिकल सेवा दिली. वेळप्रसंगी औषधांची घरपोच सेवा देत रूग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यांनी आत्यावश्यक सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल ग्रामपंचायती मार्फत हा पुरस्कार देण्यात आला. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, सत्यजितसिंह पाटणकर व सारंग पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. नजीर मुलाणी यांनी मार्च महिन्यापासून जसे कोरोनामुळे लॉक डॉऊन सुरु झाले. तसे पाटण तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला होता. त्या काळात मेडिकल उघडण्यास शासनाने ठराविक वेळ दिली होती. त्या वेळेत त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी औषधे पुरवठा केली. एवढेच नाही तर गरजूंना घरपोहच औषधे पोहचवली. त्यांचे हे कार्य अवितरपणे सुरु होते. त्यांच्या याच कार्याची दखल घेवून त्यांना कोरोना योद्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लोकांची सेवा करणे हेच आपले कर्तव्य
मानवता हाच धर्म, माणुसकी हीच जात. माणसाने माणसांसाठी कर्तव्य करत राहणे असे आपण सांगतो. त्याप्रमाणेच मीही कार्य करत आहे. माझ्या कार्याची दखल घेवून माझा सन्मान झाला यातच मी भरुन पावलो.