वृत्तसंस्था/ पॅरीस
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पॅरीस मास्टर्स टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉप सीडेड टेनिसपटू राफेल नदालने बुधवारच्या दुसऱया फेरीतील सामन्यात आपल्याच देशाच्या लोपेझचा पराभव केला. एटीपी टूरवरील स्पर्धेतील नदालचा हा 1000 वा विक्रमी विजय आहे. एटीपी टूरवर असा पराक्रम करणारा नदाल हा चौथा टेनिसपटू आहे.
आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत नदालने 20 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत तसेच त्याने 13 वेळा प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. बुधवारच्या सामन्यात नदालने लोपेझचा 4-6, 7-6 (7-5), 6-4 असा पराभव करत तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. 2002 च्या एप्रिलमध्ये नदालने आपल्या वयाच्या 15 व्या वर्षी एटीपी टूरवरील पहिला विजय नोंदविला होता. एटीपी टूरवर आतापर्यंत अमेरिकेच्या जिमी कॉनर्सने सर्वाधिक म्हणजे 1274 विजय नोंदविले असून स्वीसचा रॉजर फेडरर 1242 विजयासह दुसरे आणि इव्हान लेंडलने तिसरे स्थान मिळविले आहे. पॅरीस मास्टर्स स्पर्धेत नादालचा तिसऱया फेरीतील सामना थॉमसनशी होणार आहे. थॉमसनने दुसऱया फेरीतील सामन्यात क्रोएशियाच्या कोरिकचा 2-6, 6-4, 6-2 असा पराभव केला.