वृत्तसंस्था/ ऍकापुल्को (मेक्सिको)
एटीपी टूरवरील येथे सुरू होणाऱया ऍकापुल्को पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत 21 विक्रमी ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविणारा स्पेनचा 35 वर्षीय राफेल नदालचा सलामीचा सामना रिले ओपेल्काशी होणार आहे.
अलिकडेच नदालने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद मिळवून आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 21 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविण्याचा विश्वविक्रम केला होता. नदाल आणि ओपेल्का यांच्यात दुसऱयांदा गाठ पडत आहे. यापूर्वी रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत नदालने उपांत्य सामन्यात ओपेल्काचा 6-4, 6-4 असा पराभव केला होता. नदालने ऍकापुल्को टेनिस स्पर्धा यापूर्वी तीनवेळा जिंकली आहे. अमेरिकेच्या ओपेल्काने गेल्या आठवडय़ात डल्लास टेनिस स्पर्धा जिंकताना अंतिम सामन्यात अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम विजेत्या रशियाच्या मेदवेदेव्हचा पराभव केला होता.