वृत्तसंस्था/ माद्रिद
21 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे पटकावणाऱया स्पेनच्या राफेल नदालने बरगडीत स्ट्रेस प्रॅक्चर झाल्याचे मंगळवारी जाहीर केले.
या दुखापतीमुळे चार ते सहा आठवडे त्याला टेनिसपासून दूर रहावे लागणार असल्याचेही त्याने सांगितले. नदालने या मोसमात 20 सामने जिंकत चांगली सुरुवात केली होती. गेल्या रविवारी इंडियन वेल्स स्पर्धेतील अंतिम फेरीत त्याला टेलर फ्रिट्झकडून या मोसमातील पहिला पराभव स्वीकारावा लागला. स्पेनमध्ये दाखल झाल्यानंतर तपासणी करून घेतल्यावर आपल्या एका बरगडीला स्ट्रेस प्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे चार ते सहा आठवडे टेनिसपासून अलिप्त रहावे लागणार असल्याचे त्याने ट्विटच्या माध्यमातून सांगितले. सोमवारी जाहीर झालेल्या एटीपी मानांकनात तो तिसऱया स्थानावर पोहोचला आहे.